Swapnapurti Saptapadichi 2025 - Get-together by AVSD for Prospective Boys & Girls
आमच्या विषयी थोडसं...
.
" अध्यक्षांचे मनोगत "
जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विवाह. दोन हृदयांचे, दोन विचारांचे आणि दोन कुटुंबांचे पवित्र नाते या सोहळ्याने जुळते. या बंधनात आपुलकी, विश्वास, संस्कार आणि संस्कृतीची जोपासना होत राहते. याच उदात्त हेतूने आर्य वैश्य समाज, दिग्रस तर्फे उपवर–उपवधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत योग्य जोडीदार शोधणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक बनले आहे. यात वेळ, श्रम आणि आर्थिक साधनांचा मोठा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर एकाच छताखाली समाजातील सर्व उपवर–उपवधूंची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे.
हा मेळावा केवळ विवाह जुळविण्याचे व्यासपीठ नाही, तर समाजातील ऐक्य, आपुलकी आणि परंपरेचे जतन करणारा एक सामाजिक उत्सव आहे. आपल्या भावी जीवनसाथीच्या शोधात ही सुवर्णसंधी उपयोगात आणून आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार व्हावे, हाच यामागचा उद्देश आहे.
माझी मनापासून इच्छा आहे की समाजातील जास्तीत जास्त उपवर–उपवधू या मेळाव्यात सहभागी होवोत, आणि आपल्या आयुष्याचा जीवनसाथी निवडण्याचा हा पवित्र क्षण सुंदर व अविस्मरणीय ठरो. आपल्या सर्वांना या मेळाव्याबद्दल हार्दिक शुभेच्छा...! जय वासवी🌹🙏🏻
सचिन लक्ष्मणराव बनगीनवार
अध्यक्ष – आर्यवैश्य समाज, दिग्रस
अध्यक्ष श्री सचिन बनगिनवार
उपाध्यक्ष श्री डॉ मिलिंद पदमावार
उपाध्यक्ष श्री रामदास पदमावार
सचिव श्री सखाराम तुंडलवार
सह सचिव श्री विवेक बनगिनवार
कोषाध्यक्ष श्री विशाल सत्तुरवार
सह कोषाध्यक्ष श्री ओम कन्नावार
सदस्य :-
श्री.मंगेश दुद्द्लवार
श्री शरद पदमावार
श्री धनंजय निलावार
श्री मुकेश कोंडावार
श्री पंकज चक्करवार
श्री पंकज गुज्जलवार
श्री गजानन चिंतावार
श्री समीर उपलेंचवार
श्री महेश व्यवहारे
श्री गौरव दुद्द्लवार
श्री अंकुश गट्टावार